चैतन्य ॲग्रो इंजीनियरिंगची सुरुवात सन १९८४ रोजी ओतूर या छोट्याशा कृषिप्रधान गावातून झाली. चैतन्य ॲग्रो इंजिनियरिंग माध्यमातून सुरुवातीला नांगर, फणनी, ट्रॅक्टरचे अवजारे व शेती उपयुक्त अवजारांची निर्मिती व दुरूस्ती अशी कामे केली जात असत.
सन १९९४ साली चैतन्य ॲग्रो इंजीनियरिंगची संपूर्ण जबाबदारी उच्चशिक्षित अनिल डुंबरे यांच्या हाती आली. अनिल डुंबरे हे शिक्षणासोबतच घरची शेती करत असल्याने शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण त्यांना होती, अनिल डुंबरे यांची शेती पुणे जिल्ह्यातील कांद्याचे मुख्य आगार असलेल्या ओतूर गावामध्ये असल्यामुळे तेथील शेतकऱ्यांना कांदा पिकाचे उत्पादन घेताना उत्पादन खर्च व मजूर या मुख्य प्रश्नांना सामोरे जावे लागत होते.

कांदा लागवड करत असताना पूर्वी कल्टिव्हेटरला लाकडी फळ्या लावून सारे पाडले जात असत व नंतर बैलाच्या साह्याने आडवे दंड (पाट) पाडले जात होते, परंतु यामध्ये लेवल करण्यासाठी मजुरांची मदत घ्यावी लागत होती. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होऊन सुध्दा अधिक वेळ लागल्याने हा प्रश्न आपण एखाद्या यंत्राद्वारे सोडू शकतो का असा प्रश्न अनिल डुंबरे यांना पडला, ही बाब लक्षात घेऊन अनिल डुंबरे यांनी प्रथम सारायंत्रची संकल्पना कागदावर मांडली. आपल्या वर्कशॉपमध्ये अवजाराची छोटी प्रतिकृती तयार करून त्याची वेळोवेळी चाचण्या घेण्यात आल्या. कधी ह्या चाचण्या मनाप्रमाणे होत नसे तर कधी यशस्वी ठरत होती, कधी कधी नवीन प्रश्न उभे राहत होते. शेतकर्याचा हा प्रश्न सोडवयाचा या जिद्दीने त्यांनी आपले कार्य व संशोधन सुरु ठेवले. या सर्व गोष्टींचा अभ्यास करून २००३ मध्ये लाकडी फळ्या व लोखंडी चासीचे पहिले सारायंत्राची निर्मिती त्यांनी केली व त्याचे प्रयोग यशस्वीरित्या पार पडले.
२००४ सालानंतर वेळोवेळी या यंत्रामध्ये गरजेप्रमाणे व शेतकऱ्यांना येणाऱ्या स्थानिक अडचणीनुसार बदल करत सन २०१० मध्ये परिपूर्ण “सारायंत्र” बनले. हे परिपूर्ण बनलेले सारायंत्र अल्पावधीत अधिक शेतकऱ्यांमध्ये पोहचले. या सारायंत्रास शेतकार्यांची पसंती मिळाल्यावर हे तंत्रज्ञान सर्व शेतकार्यांपर्यंत पोहचण्यासाठी वृत्तपत्र, कृषी विभाग महाराष्ट्र शासन, कृषी विज्ञान केंद्र यांच्या शेतकरी मार्गदर्शन मेळावे व कृषी प्रदर्शन यांच्या माध्यमातून लोकप्रिय ठरले. सन २००७ साली दूरदर्शन या वाहिनीने चैतन्य ॲग्रो च्या कार्याची दाखल घेत त्यांच्या यंत्रांची माहिती प्रसारित केली. कांद्यासोबतच इतर पिकासाठी वाफे बनवण्याकरिता या यंत्राचा उपयोग केला जातो. सन २०१० नंतर चैतन्य ॲग्रो इंजीनियरिंगच्या माध्यमातून इतरही
अवजारांचे संशोधन सुरू असून अखंडपणे चालू आहे. आज चैतन्य ॲग्रो इंजीनियरिंग यांच्या संशोधन विभागाच्या माध्यमातून मल्चिंग मशीन, कांदा बी लागवड यंत्र , मका पेरणी यंत्र अशा विविध अद्यावत अवजारांचे निर्मिती झाली आहे. चैतन्य ॲग्रो इंजीनियरिंग मध्ये आज तज्ञ इंजिनियर, कुशल कारागीर कार्यरत असून संशोधन करूनच दर्जेदार उत्पादने निर्मिती व विक्री सुरू आहे.